•  

                                  Kaleidoscope, The festival of uniqueness Marathi Document.

  क्या लि डो स्को प 

  "उत्सव वैशिठ्ठ्य पूर्ण तेचा" 

  आपण सगळे ज्या जगात राहतो त्या जगात सगळे जण एकतर खूप व्यस्त आहेत त्यामुळे  एकमेकांच्या ज्या गोष्टी प्रथम समोर येतात त्या गोष्टींकडे आपण आधी लक्ष देतो पण त्यामुळे बरेचदा आपण समोरच्या व्यक्तीला काय वाटत, त्याचा विचार करण्याचा विचारही मनात येत नाही, आपण विसरतो किंवा  वेळ मिळत नाही. आणि आपण त्या व्यक्तीच्या विशेष व्यक्तिमत्त्वाच्या बाजूंना मुकतो. आपण वागत असतो  पण त्यात पूर्णत्व नसते. त्याच महत्वाच कारण सांगतांना "पिटर स्यालोवी" भावनिक बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतात कि , आज आपण समोरच्याच्या भावनांना फारस महत्त्व देत नाही. खूप जास्त जीवन गतिमान झाल्याने आपल्याकडे वेळच नाही. आपल्याला खूप जास्त गोष्टी करायच्या आहेत आणि त्या खूप पट्टकन करायच्या आहेत. त्यामुळे आपण भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करायला विसरतो. 

  " पिटर स्यालोवी"  ह्यांच्या मते, भावनिक बुद्धिमत्तेच्या तीन महत्त्वाच्या बाजू आहेत. 

  १. भावना ओळखणे, त्या समजणे ,

  २. भावना  व्यक्त करणे आणि 

  ३. त्यांचे व्यवस्थापन करणे. 

  नवीन पिढीहि अश्याच पद्धतीने मोठी होत आहे. आणि अशाच  पध्ततीने पुढे जाण्या आधी  आपण ह्या जनरेशनला वेळेवरच त्यांच्यातल्या विविध गोष्टींची ओळख करून द्यायला हवी आणि एकमेकांच्या वैशिष्ट्यपूर्ण तेचि देखील ओळख करून दिली पाहिजे. त्यामुळे ते एकमेकांच्या वैशिष्ठ्यपूर्ण तेचा आदर करायला शिकतील.  त्यांच्यांत लहानपणापासूनच भावनिक बुद्धिमत्तेची कौशल्ये निर्माण करायला हवित. 

  आम्ही "दिशा युनिक सायकोलोजीकाल कन्सल्टन्सी" फोर्ट, मुंबई (साउथ) द्वारे हा पुढाकार घेत आहोत.की, कार्यशाळा आणि विविध अनुभवांद्वारे मुलापर्यंत भावनिक बुद्धीमत्तेचे महत्त्वं हसत खेळत पोहोचवून त्यांच्यात तशी कौशल्ये निर्माण करणे. हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. 

                    संशोधन असे सांगते आणि आमचा असा विश्वास आहे, कि भावनिक बुद्धिमत्तेमुळे ह्या पिढीत खालील महत्त्वाची कौशल्ये निर्माण होण्यास मदत होईल. , 

                                           १. मुलांनमध्ये संवेदनशील ता निर्माण होईल. त्याबद्दलची जागृती येईल. 

                                           २. तेढ, तिटकारा, द्वेषाची भावना कमी होउन एकमेकांबद्दल आनंदाचे वातावरण, सकारात्मकता निर्माण होईल. 

                                           ३. भावनिक भाषेचे महत्त्व समजेल. आणि व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द सापडतात. 

                                           ४. भावनांचा समतोल ठेवायला शिकतात.  विचार आणि भावनांना योग्य दिशा देता येते. 

                                           ६. पुढील आयुष्यासाठी योग्य निर्णय घेता येतात. 

                                           ७. आयुष्य उत्तम जगण्यासाठी एक छान लक्ष्य मिळंते. अर्थपूर्णता येते. 

                                           क्यालीडोस्कोप हि एक आनंदाची पर्वणी असेल ज्याद्वारे ह्या नवीन पिढीला घडवता येईल. 

                                            धन्यवाद 

                                           आरती सूर्यवंशी 

Comments

 • (no comments)

Post Comments

This website is created and hosted by Website.com's Site Builder.